ज्ञानेश्वर उर्फ माऊली मोरे यांची राष्ट्रवादी काँग्रेस सेवादल शहराध्यक्षपदी नियुक्ती!

ज्ञानेश्वर उर्फ माऊली मोरे यांची राष्ट्रवादी काँग्रेस सेवादल शहराध्यक्षपदी नियुक्ती!

स्त्रीशक्ती न्यूज 

पिंपरी चिंचवड : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक बांधणीला बळ देण्यासाठी पक्षाने महत्त्वाचा निर्णय घेत ज्ञानेश्वर उर्फ माऊली मोरे यांची राष्ट्रवादी काँग्रेस सेवादलच्या पिंपरी चिंचवड शहराध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. पक्षाच्या नेत्या तथा राज्याच्या उपमुख्यमंत्री मा. सुनेत्रावहिनी पवार यांच्या हस्ते त्यांना अधिकृत नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.

ज्ञानेश्वर मोरे हे पक्ष स्थापनेपासून सक्रियपणे कार्यरत असून त्यांनी विविध जबाबदाऱ्या सांभाळत संघटन मजबूत करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. गेली नऊ वर्षे त्यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शहर फेरीवाला समिती सदस्य म्हणून काम करत सर्वसामान्यांच्या प्रश्नांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. पक्षाचे ज्येष्ठ नेते मा. अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनामुळेच आपल्याला काम करण्याची संधी मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

नवीन जबाबदारी स्वीकारल्यानंतर मोरे यांनी शहरातील सेवादलाची कार्यकारिणी राज्यातील सर्वात मोठी व कार्यक्षम करण्याचा निर्धार व्यक्त केला. सुनेत्रावहिनी पवार आणि पार्थदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्ष संघटन अधिक मजबूत करून अजितदादांचे विकासाचे स्वप्न साकार करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले