सुपर मास्टर्स गेम्स अँड स्पोर्ट्स फेडरेशनतर्फे ८ वी राष्ट्रीय मास्टर्स स्पर्धा.
streeshaktinews
Nov 18, 2025
60
0
स्त्रीशक्ती न्यूज
पिंपरी-चिंचवडमध्ये पहिल्यांदाच राष्ट्रीय दर्जाची मोठी क्रीडा स्पर्धा आयोजित होत आहे.
सुपर मास्टर्स गेम्स अँड स्पोर्ट्स फेडरेशनतर्फे ८ वी राष्ट्रीय मास्टर्स स्पर्धा
२७ ते ३१ जानेवारी २०२६ दरम्यान पिंपरी-चिंचवडमध्ये रंगणार आहे.
संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनोद कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार,
या भव्य स्पर्धेत देशभरातून ५,००० पेक्षा जास्त नामांकित खेळाडू सहभागी होणार आहेत.
कबड्डी, हॉकी, हॅण्डबॉल, फुटबॉल, व्हॉलीबॉल आणि टेनिस बॉल अशा सांघिक स्पर्धांसह,
ऍथलेटिक्स, तिरंदाजी, बुद्धिबळ, पोहणे, बॅडमिंटन, वेटलिफ्टिंग, योगा,
एअर पिस्टल, एअर रायफल यांसारख्या वैयक्तिक स्पर्धादेखील रंगणार आहेत.
या सर्व स्पर्धांमध्ये ३० वर्षांवरील स्त्री-पुरुष खेळाडूंना सहभागी होता येणार आहे.
शहरातील क्रीडा संकुल, जलतरण तलाव आणि विविध स्टेडियममध्ये या स्पर्धा पार पडतील.
पिंपरी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत
महाराष्ट्र अध्यक्ष रामसिंह संघा, सचिव शैलेश फुलसुंगे आणि
उपाध्यक्ष चंद्रशेखर कुदळे उपस्थित होते.
यावेळी स्पर्धेचे अधिकृत बोधचिन्ह—"शुभंकर शेकरू"—याचे अनावरण विनोद कुमार यांच्याकडून करण्यात आले.
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी १० जानेवारी २०२६ पर्यंत नोंदणी करता येणार असून,
ऑनलाईन नोंदणीसाठी mastersgames.in ही सुविधा उपलब्ध आहे.
तर ऑफलाईन नोंदणीसाठी सरचिटणीस शैलेश फुलसुंघे — (९७६४९२९१७१) — यांच्याशी संपर्क साधावा.
२०१७ मध्ये डॉ. अनमोल रतन सिद्धू आणि विनोद कुमार यांच्या नेतृत्वाखाली
स्थापित झालेल्या या राष्ट्रीय संस्थेने देशभरात आतापर्यंत
चंदीगड, डेहराडून, बडोदा, त्रिवेंद्रम, वाराणसी, गोवा आणि धर्मशाळा येथे
विविध स्पर्धा आयोजित केल्या आहेत.
या स्पर्धांमध्ये आतापर्यंत ३३,००० पेक्षा अधिक खेळाडू सहभागी झाले आहेत.
धर्मशाळा येथे एप्रिल २०२५ मध्ये झालेल्या स्पर्धेत
पंजाबच्या १०२ वर्षीय जगीर सिंग यांनी १०० आणि २०० मीटर धावण्यामध्ये
प्रथम क्रमांक पटकावून प्रेरणादायी विक्रम नोंदवला होता.
नागरिकांमध्ये खेळांविषयी आवड निर्माण करणे हा संस्थेचा मुख्य उद्देश असल्याचे
यावेळी सांगण्यात आले.
दरम्यान, पिंपरी-चिंचवडमध्ये होणाऱ्या या भव्य स्पर्धेसाठी
आयोजन समितीची घोषणा देखील करण्यात आली असून
विनोद कुमार अध्यक्ष तर रामसिंग संघा, चंद्रशेखर कुदळे,
शैलेश फुलसुंघे यांसह विविध का
र्यकारिणी सदस्यांचा त्यात समावेश आहे.
Comments (0)
Facebook Comments (0)