पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे:पिंपरी चिंचवड पोलिसिंगचा नवा अध्याय लिहणारे नेतृत्व

पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे:पिंपरी चिंचवड पोलिसिंगचा नवा अध्याय लिहणारे नेतृत्व

स्त्रीशक्तीnews 

पिंपरी चिंचवड: महाराष्ट्राचे एक वेगाने बदलणारे शहर.औद्योगिक साम्राज्य, आयटी हब, सतत वाढणारी लोकसंख्या आणि दिवसेंदिवस उंचावणाऱ्या अपेक्षा—या सर्वांना सामोरं जात शहराला सुरक्षिततेची नवी हमी देणारे नाव म्हणजे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे. भा.पो.से. अधिकारी म्हणून देशभरातील विविध विभागांत काम करत त्यांनी सिद्ध केलंय—पोलीसिंग केवळ वर्दी नाही…तर दृष्टिकोन,धाडस आणि शाश्वत परिणामांचा प्रवास आहे.

शहरात त्यांच्या नियुक्तीच्या पहिल्या दिवसापासूनच एक बदल जाणवू लागला. कायदा-सुव्यवस्थेत शिस्त, गुन्हेगारीवर तातडीची टक्कर, तंत्रज्ञानावर आधारित पाहणी व्यवस्था आणि दलामध्ये समन्वय—या सर्वांचा परिणाम शहरभर जाणवू लागला. नागरिकांमध्ये सुरक्षा आणि विश्वासाचं वातावरण निर्माण करणं हेच त्यांच्या नेतृत्वाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य ठरलं.

याच सकारात्मक बदलाचा पुढचा टप्पा म्हणजे त्यांनी साकारलेला “पिंपरी चिंचवड पोलीस दलाचा स्वतंत्र घटक ध्वज”. ही केवळ रचना नव्हती… हा एक संदेश होता.

स्वतः आयुक्त विनय कुमार चौबे यांनी या ध्वजाचे रेखाचित्र तयार करून महासंचालक कार्यालयाला प्रस्तावित केलं—कारण एक ओळख, एक सन्मान आणि एक ध्येय… दल एकत्र बांधून ठेवतात.

या ध्वजातील प्रतीक शहराच्या आत्म्याला अचूक पकडते

कर्तव्यनिष्ठा,शिस्त,वेग,धैर्य आणि सेवाभाव.

ही पाच मूल्ये चौबे यांच्या कार्यशैलीची पाया आहेत. शहराच्या वेगवान वाढत्या पावलं सांभाळण्यासाठी दलाविषयी अभिमान आणि एकसंघ ओळख निर्माण करण्याचा हा उपक्रम नागरिकांमध्येही विश्वास निर्माण करणारा आहे.

विविध कारवाया, गुन्हे उघडकीस आणण्याचा वेग, अचूक नियोजन, स्मार्ट पोलिसिंग… या सर्वांनी चौबे यांच्या संघटनात्मक नेतृत्वाची निव्वळ झलक नाही—तर एका शहराला सुरक्षित भविष्यात नेणारे पाऊल आहे. नागरिक, उद्योग जगत, आयटी कंपन्या, विद्यार्थी, कामगार—सर्वांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्याचा त्यांनी घेतलेला निर्धार आज फलदायी ठरत आहे.

शिस्त,पारदर्शकता, तत्परता आणि संवेदनशीलता आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या पोलिसिंगची चार बळकट स्तंभ.

आणि याच चार स्तंभांवर पिंपरी चिंचवड पोलीस दल उभं राहतंय एका नव्या युगाच्या दारात.

विनय कुमार चौबे यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी चिंचवड पोलिसांचा हा प्रवास केवळ प्रशासनिक बदल नाही.

तो आहे

“सुरक्षेचं वचन, विश्वासाची पुनर्स्थापना आणि आधुनिक पोलिसिंगचा नवा अध्याय.”