प्रभाग क्रमांक ९ मध्ये ‘विजय संकल्प जाहीर सभा’ उत्साहात;नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद
स्त्रीशक्ती न्यूज
पिंपरी–चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ९ मध्ये आयोजित करण्यात आलेली “भव्य विजय संकल्प जाहीर सभा” आज प्रचंड उत्साहात आणि मोठ्या जनसहभागात पार पडली. प्रभागाच्या सर्वांगीण विकासाचा निर्धार करत आयोजित करण्यात आलेल्या या सभेला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपला पाठिंबा व्यक्त केला.
या जाहीर सभेला पिंपरी–चिंचवड महापालिकेचे माजी महापौर मा. श्री. हनुमंतराव (अण्णा) भीमराव भोसले तसेच महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष व पिंपरी विधानसभा आमदार मा.श्री.अण्णासाहेब बनसोडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. दोन्ही मान्यवरांनी उपस्थित कार्यकर्ते, पदाधिकारी आणि उमेदवारांना मार्गदर्शन करत आगामी निवडणुकीसाठी एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले.
सभेत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे प्रभाग क्रमांक ९ मधील चारही उमेदवार — सिद्धार्थ अण्णासाहेब बनसोडे (अ), सौ. डॉ. वैशालीताई घोडेकर (लोंढे) (ब), सौ. सारीकाताई विशाल मासुळकर (क) आणि श्री. राहुल हनुमंतराव भोसले (ड) — यांनी नागरिकांशी थेट संवाद साधत आपल्या विकास आराखड्याची माहिती दिली. पाणीपुरवठा, ड्रेनेज व्यवस्था, रस्ते, स्वच्छता, आरोग्य सेवा, महिला व युवकांसाठी सुविधा तसेच मूलभूत नागरी सोयीसुविधा मजबूत करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी सांगितले की, प्रभाग क्रमांक ९ हा पिंपरी–चिंचवड शहराच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असून येथील पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी सुसूत्र नियोजन आणि पारदर्शक प्रशासन आवश्यक आहे. यासाठी चारही उमेदवारांची टीम एकजुटीने काम करणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सभास्थळी नागरिकांची मोठी गर्दी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह पाहता वातावरण पूर्णपणे निवडणूकमय झाले होते. विविध भागांतून आलेल्या नागरिकांनी उमेदवारांप्रती विश्वास व्यक्त करत विकासासाठी त्यांना संधी देण्याची मागणी केली.
शेवटी उपस्थितांनी येणाऱ्या महापालिका निवडणुकीत ‘घड्याळ’ या निवडणूक चिन्हासमोरील बटन दाबून चारही उमेदवारांना प्रचंड बहुमतांनी विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला. या जाहीर सभेमुळे प्रभाग क्रमांक ९ मधील निवडणूक प्रचाराला नवी ऊर्जा मिळाल्याचे चित्र दिसून आले.




Comments (0)
Facebook Comments (0)