स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषण’’ ला ढोल-ताशांची ऐतिहासिक मानवंदना उपक्रमाचे वृत्तांकन, प्रक्षेपण
स्त्रीशक्ती news
पिंपरी-चिंचवड शहरातील मोशी-बोऱ्हाडेवाडी येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे जगातील सर्वांत उंच पूर्णाकृती शिल्प उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. या शिल्पामुळे शिव-शंभू विचार आणि हिंदवी स्वराज्याच्या जाज्वल्य इतिहासाला पुन्हा एकदा उजाळा मिळणार आहे. कारण, या ठिकाणी भव्य ‘‘शंभूसृष्टी’’ सुद्धा उभारण्यात येत आहे.
आमदार श्री. महेश किसनराव लांडगे यांच्या संकल्पनेतून आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्या पुढाकाराने हे अतिभव्य शिल्प पिंपरी-चिंचवड, पुणेसह महाराष्ट्राच्या वैभवामध्ये भर घालणारे आहे.
या ऐतिहासिक शिल्पाचे अनावरण लवकरच करण्यात येणार असून, शिल्पाबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्याप्रती अपार श्रद्धा आणि निष्ठा असलेल्या शिव-शंभू प्रेमींच्या आग्रहाने ‘‘स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषण’’ ला ढोल-ताशांच्या गजरामध्ये ऐतिहासिक मानवंदना देण्यात येणार आहे. या माध्यमातून ‘‘स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषण’बाबत जनजागृती व्हावी, असा आमचा मानस आहे.
त्या अनुशंगाने, या कार्यक्रमाचे वृत्तांकन, थेट प्रक्षेपण व्हावे. या करिता आपला पत्रकार प्रतिनिधी, छायाचित्रकार, व्हीडिओग्राफर यांना सदरच्या कार्यक्रमाचे वृत्तांकन करण्याबाबत कळवावे, अशी विनंती आहे.
शिव-शंभूंच्या विचारांचा जागर व्हावा. या करिता आयोजित उपक्रमात आपला सहयोग मिळावा, हीच अपेक्षा!
स्थळ : ‘स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषण’, बोऱ्हाडेवाडी, मोशी, पिंपरी-चिंचवड, पुणे.
(https://maps.app.goo.gl/m1AGxZez9c5kVvrY8)
वेळ : दि. 14 स्पटेंबर 2025, दुपारी - 3 वाजता.




Comments (0)
Facebook Comments (0)