पुर्णानगरमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्राची मागणी गेली अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे.
पुर्णानगरमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्राची मागणी गेली अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे…
स्थानिक रहिवासी, ज्येष्ठ मंडळे आणि विविध सामाजिक संघटनांनी सातत्याने प्रशासनाकडे पाठपुरावा केला,
तरीही या भागातील ज्येष्ठांना आजतागायत कोणतीही ठोस सुविधा उपलब्ध झालेली नाही.
दिवसभर एकटे राहणाऱ्या ज्येष्ठांचा मानसिक ताण वाढतोय तरुण मंडळी नोकरी-व्यवसायासाठी बाहेर पडतात आणि संवादासाठीही कोणी नसलेली परिस्थिती .ज्येष्ठांच्या मानसिक आरोग्याला धोकादायक ठरत असल्याची तज्ञांचीही स्पष्ट चेतावणी आहे.
विरंगुळा केंद्रांमधून मिळणारा संवाद, हलका व्यायाम, ग्रुप अॅक्टिव्हिटी—
ही सर्व ताण कमी करण्यास, आरोग्य सुधारण्यासाठी आणि समाजाशी जोडून ठेवण्यासाठी महत्त्वाची ठरतात.
मात्र पुर्णानगरमध्ये असा कोणताही केंद्र आजही अस्तित्वात नाही.ज्येष्ठ मंडळे, महिला मंडळे आणि नागरिकांनी अनेक वेळा निवेदने दिली…उपलब्ध जागांची पाहणी, आराखडा, आवश्यक सुविधा
सर्व प्रस्ताव प्रशासनापर्यंत सतत पोहोचवले गेले.
परंतु विभागांमधील समन्वयाचा अभाव आणि फाईल्स पुढे न सरकणे
हा मुद्दा आजही जैसे थे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
“सर्व माहिती असूनही निर्णय का घेतला जात नाही?”—
असा थेट सवाल ज्येष्ठ नागरिकांनी प्रशासनाला केला आहे.
नगर नियोजन, सामाजिक विकास आणि बांधकाम विभागाकडून
वेगवेगळी माहिती दिली जात असल्याने नागरिकांमध्ये संभ्रम वाढत आहे.
"प्रस्ताव विचाराधीन" असे सांगितले जात असले, तरी प्रत्यक्षात काहीच हालचाल नाही,
म्हणूनच नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे.पी
महिला मंडळांच्या सदस्या म्हणतात—
“ज्येष्ठ व्यक्तींना घराबाहेर पडण्यासाठी सुरक्षित जागा हवी.
एकटेपणामुळे आरोग्याच्या समस्या वाढत आहेत.”
तर ज्येष्ठ मंडळांचे म्हणणे स्पष्ट—
“मंजुरी मिळेपर्यंत आमचा पाठपुरावा थांबणार नाही.
ही सुविधा आमचा हक्क आहे.”
नागरिकांचे मत एकच
विरंगुळा केंद्र उभारणे ही केवळ सुविधा नाही…
तर समाजातील ज्येष्ठांसाठी मानवी हक्काची गरज आहे.
या केंद्रामुळे मनोरंजनाबरोबरच मानसिक स्थैर्य, सामाजिक आरोग्य
आणि ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनगुणवत्तेत मोठी वाढ होणार आहे




Comments (0)
Facebook Comments (0)