देशाच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावणारी पिंपरी चिंचवड महानगरपालिका देशात पहिली,मुख्यमंत्र्याकडून कौतुक
देशाच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या महापालिकांनी आर्थिक बाबतीत आत्मनिर्भर झाले पाहिजे, असा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा आग्रह आहे.
मोदी यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत पिंपरी चिंचवड महापालिकेने हरित कर्ज रोखे बाजारात आणले आहे
देशाच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या महापालिकांनी आर्थिक बाबतीत आत्मनिर्भर झाले पाहिजे, असा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा आग्रह आहे. मोदी यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत पिंपरी चिंचवड महापालिकेने हरित कर्ज रोखे बाजारात आणले आहेत. अशा प्रकारे भांडवली बाजारातून निधी उभारणारी
पिंपरी – चिंचवड ही देशातील पहिली महानगरपालिका ठरली आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.
पिंपरी – चिंचवड महापालिकेचे हरित कर्ज रोखे मुंबई शेअर बाजारात सुचिबद्धता (लिस्टिंग) प्रक्रिया बॉम्बे स्टॉक एक्सचेंज मधील बीएसई आंतरराष्ट्रीय सभागृहात पार पडला. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार, आमदार महेश लांडगे, शंकर जगताप, अमित गोरखे, आमदार उमाताई खापरे, मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंग, प्रधान सचिव डॉ. के गोविंदराज, बॅाम्बे स्टॅाक एक्स्चेंजचे व्यवस्थापकीय संचालक सुंदरम रामामूर्ती आदी उपस्थित होते.
पिंपरी – चिंचवड महापालिकेने बाजारात आणलेल्या हरित कर्ज रोख्यांना जनतेकडून चांगला प्रतिसाद मिळाला.
गुंतवणूकदारांनी भरभरून गुंतवणूक केली.
कर्ज रोखे बाजारात आणल्यानंतर काही मिनिटांतच शंभर कोटी रुपयांची गुंतवणूक याद्वारे करण्यात आली. त्यानंतर पाच पटीने गुंतवणूकदारांमध्ये वाढ झाली. या वरून गुंतवणूकदारांचा हरित कर्ज रोख्यांवरील विश्वास दिसतो. या रोख्यांचा कालावधी पाच वर्षांचा असून, त्यासाठी ७.८५ टक्के स्पर्धात्मक व्याजदर निश्चित करण्यात आला आहे, अशी माहिती फडणवीस यांनी दिली.




Comments (0)
Facebook Comments (0)